प्रशासकाच्या नाकाखाली सुरू होता काळाबाजार;
पत्रकार धनंजय सोनार व परेश उदेवाल यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळणार!
अमळनेर पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या भंगार चोरांची आता उलटगणती सुरू झाली आहे. पाणी पुरवठा विभागातील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी पालिकेचे साहित्य धुळे-मालेगावात विकून लाखो रुपये लाटले. विशेष म्हणजे, प्रशासक काळात या चोरांना मोकळे रान मिळाले होते.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार (चौकडी की पंचक ?) आतापर्यंत उजळ माथ्याने फिरत होते.
लोकहितवादी पत्रकार धनंजय सोनार यांनी या प्रकरणी तीन वर्षापूर्वी लेखी तक्रार व सतत बातम्या केल्या होत्या. तसेच सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाला जाग आणली. असाच पाठपुरावा परेश उदेवाल यांनी केल्याने आता भ्रष्टाचाऱ्यांचे 'काळे साम्राज्य' कोसळणार असून, लवकरच मोठी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भ्रष्टाचाराचा अड्डा ठरलेल्या पाणी पुरवठा विभागातील भंगार थेट धुळे-मालेगावला रवाना करून चोरांनी हात धुतला.
अर्थपूर्ण तडजोडी करून तक्रार करणाऱ्यांचे तोंड पैशांनी दाबण्याचा प्रकार आता चालणार नाही कारण
नाशिक आयुक्तांकडून प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेल्याने तसेच पत्रकार धनंजय सोनार आणि तरुण कार्यकर्ता परेश उदेवाल यांच्या पाठपुराव्यामुळे चोरांचे धाबे दणाणले आहे.
अमळनेर मुख्याधिकारी यांनी मी नवीन असल्याने या प्रकरणी काही माहीत नसल्याचे सांगून चौकशी करून कारवाई करेल असे सांगितले.
कोण आहेत हे चार -पंचक? कधी कशी घडली घटना? वाहन कुणाचे? कुणी भंगार घेतली? किती वाटे पडले? आता पर्यंत कारवाई का होत नहोती? या बाबत सविस्तर फक्त लोकहितवादी लिहिणार.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments