सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत.
राहुल कंजर यांची युवासेना तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली सोबतच कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली. शिवसेना नेते व राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर युवासेनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संसदरत्न खा. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि युवासेना सचिव किरण साळी यांच्या आदेशानुसार, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांनी निवडीची अधिकृत घोषणा केली.
या नूतन कार्यकारिणीत तालुका प्रमुख पदी राहुल भास्कर कंजर, तर विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी पंकज संतोष शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर प्रमुख पदी प्रविण पुरुषोत्तम पाटील यांची निवड झाली असून, उपशहरप्रमुख म्हणून करण सुपडू चव्हाण, शेख अल्ताप राजा फारुख आणि तुषार महेंद्र सोनार कार्यभार पाहतील. शहर संघटक पदी राकेश रविंद्र लांडगे, उपशहर संघटक पदी यश मोहन साळुंखे, कॉलेज कक्ष प्रमुख पदी शंतनु शामकांत भावसार, कॉलेज कक्ष सचिव पदी गौरव रविंद्र पाटील आणि सोशल मीडिया प्रमुख पदी खेमचंद सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र जिल्हाप्रमुखांच्या सहीने प्राप्त झाले आहे.
नवनियुक्त तालुकाप्रमुख राहुल कंजर हे एक उत्कृष्ट संघटक व विनयशील तरुण म्हणून परिचित आहेत. शहर व तालुका कार्यकारिणीत सक्रिय आणि कष्टाळू कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आल्याने अमळनेरमध्ये शिवसेना संघटन वाढीसाठी युवासेनेचा मोठा हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या निवडीबाबत बोलताना शिवसेना तालुका प्रमुख गुलाब पाटील म्हणाले की, "युवा कार्यकर्त्यांची ही तडफदार फळी तयार झाल्यामुळे पुन्हा एकदा नवमतदार मोठ्या संख्येने संघटनेशी जोडले जातील."
या निवडीबद्दल माजी आमदार शिरीषदादा चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, शिवसेना तालुका प्रमुख गुलाब पाटील, शहर प्रमुख भरत पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण व शहरी भागातील शिवसेना आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी या निवडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.
लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
७९७२८ ८१४४०
0 Comments