अमळनेर येथील प्रसिद्ध सुवर्ण पेढी 'पारस गोल्ड' यांच्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अमळनेरकर रसिकांसाठी एका विशेष सांगीतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. 'स्वरचैतन्य' या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाच्या मैफिलीद्वारे सुरांच्या साक्षीनं यंदाची अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे.
पहाटे रंगणार सुरांची मैफल
१९ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. अमळनेरमध्ये प्रथमच अशा प्रकारची सांगीतिक पहाट आयोजित करण्यात आली असून, यामध्ये प्रख्यात गायक पं. आशिष रानडे आणि पं. ज्ञानेश्वर कासार आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
पारस गोल्डतर्फे 'सुवर्ण' भेट
आपल्या ५४ वर्षांच्या विश्वासार्ह परंपरेचे औचित्य साधून 'पारस गोल्ड'ने ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. 'मंगळसूत्रांचे माहेरघर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पेढीवर अक्षय्य तृतीयेनिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर तितक्याच वजनाची चांदी मोफत देण्यात येणार आहे.
"अमळनेरच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसा असा हा कार्यक्रम आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. भक्ती आणि संगीताच्या माधुर्याने शहराची सकाळ मंगलमयी व्हावी, हाच यामागचा उद्देश आहे," असे पारस गोल्ड व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.
या मैफिलीचा लाभ अमळनेरमधील जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments