लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, २७ जून २०२६ रोजी अमळनेर येथील एस.एन.डी.टी. (SNDT) कॉलेजमध्ये 'मा फाउंडेशन'च्या वतीने एका विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात आम आदमी पार्टीच्या (AAP) अमळनेर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
एस.एन.डी.टी. कॉलेजचे प्राचार्य शेख यांच्या शिफारसीनुसार हा गौरव करण्यात आला. आपचे तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंखे आणि उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील हे शहरात दररोज राबवत असलेल्या स्वच्छता अभियानाची व सत्कार्याची दखल घेऊन त्यांना हे विशेष सन्मान देण्यात आले आहेत.
आप चे तालुकाध्यक्ष तथा भाग्यलक्ष्मी क्लिनिकल लॅबचे संचालक महेंद्र नाना साळुंके
यांना त्यांच्या आरोग्य व स्वच्छता क्षेत्रातील योगदानाबद्दल 'राष्ट्रीय स्वच्छता अभियान आणि आरोग्य जनजागृती गौरव सन्मान २०२६' देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच
रामकृष्ण चिंतामण पाटील (उपाध्यक्ष, आप) यांना अमळनेर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 'राष्ट्रीय स्वच्छ शहर आणि सुंदर शहर अमळनेर जनजागृती गौरव सन्मान २०२६' प्रदान करण्यात आला. याच समारंभात राजेंद्र बाळकृष्ण जाधव (तालुका सचिव, आप)
यांना त्यांच्या पर्यावरण विषयक कार्यासाठी 'पर्यावरण जनजागृती गौरव सन्मान २०२६' देऊन गौरविण्यात आले.
आम आदमी पार्टीच्या या तिन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिळवलेल्या या सन्मानाबद्दल अमळनेर शहरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments