दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ पाहणाऱ्या अनंत निकम याने आधी गंगेत जावून नहावे अशी वेळ त्याचेवर आली आहे.
सार्वजनिक जीवनात वावरताना, विशेषतः पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात सक्रिय असताना, नैतिकतेचा मुलामा चढवणे खूप सोपे असते. मात्र, जेव्हा 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' अशी भूमिका घेतली जाते, तेव्हा ती दुतोंडी ठरते. एका धक्कादायक प्रकारामुळे, न्यायाची आणि पारदर्शकतेची भाषा करणाऱ्या अनंत निकम या 'स्वयंभू' सुधारकांचे पितळ उघडे पडले आहे.
हा घ्या पुरावा...
एकीकडे भ्रष्टाचार, चोरी आणि अन्यायाविरुद्ध शड्डू ठोकून 'आम्हीच धुतल्या तांदळाचे' असे भासवणारे हे महाशय... आणि दुसरीकडे खुद्द त्यांच्याच निवास्थानी वीज चोरीचा प्रकार उघडकीस येणे, ही बाब केवळ संतापजनक नाही, तर अत्यंत संशयास्पद व लाजिरवाणी आहे.
काय आहे हा विरोधाभास?
ज्या भ्रष्ट यंत्रणेवर व उठसुठ कुणावर देखील अनंत निकम जाहीर व्यासपीठावरून ताशेरे ओढत लोकांच्या अंगावर धावून जात आहे त्याच निकमने वीज चोरीची रक्कम भरावी.. हा प्रचंड विरोधाभास आहे.
स्वतःच्या घरातील वीजचोरी प्रकरणी चक्क दंड भरला, गुन्हा दाखल होवून जेल वारी टाळण्यासाठी महावितरण अभियंत्यांचे गुढग्यावर बसून पाय पडला हे जग जाहीर आहे, आता यावर अनंत निकम काय उत्तर देणार आहे,?
आम्ही सत्याचे पाईक असा दावा करणाऱ्या अनंत निकम याने स्वतःच्या अंगणात काय चालले आहे, याकडे दुर्लक्ष करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे आता थांबवावे. जेव्हा तुम्ही इतरांच्या चुकांवर बोट ठेवता, तेव्हा आपण स्वतःचा चरित्रदाखला कोरा आहे हे ठळक पने सांगणे ही देखील जबाबदारी आहे.
स्वतः बेलाशक किंवा चोरांना साथ द्यायची आणि दुसऱ्यावर कारण नसताना आरोप करून प्रसिद्धिपत्रके काढायची, हा दुटप्पीपणा या पुढे चालणार नाहीं.
-------------
उद्या लोकहितवादी घेवून येत आहे नवीन विषय..
इंदोर येथील महिलेला झासा देवून 'शेअर मार्केट ' चे लाडू देणाऱ्याचे मार्केट भाव गडगडणार!
--------------
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
0 Comments