​संस्कारांचे धिंडवडे! बापाच्या घामावर जगणाऱ्या 'शिक्षक' नावाच्या 'कलंका'चा बुरखा फाडणार!

ज्या बापाने स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मुलाच्या भविष्यासाठी खर्ची घातला, ज्याने स्वतःची जमीन गहाण ठेवून मुलाला नामवंत संस्थेत शिक्षक म्हणून उभे केले, संस्था चालकांचे पाय पडून मिनतवारी केली... आज त्याच बापाची अवस्था 'दारोदारी फिरून रडण्याची' झाली आहे. हे दुर्दैव आहे एका अशा सुशिक्षित शिक्षक पुत्राचे, ज्याने केवळ जन्मदात्याचे उपकारच विसरले नाहीत, तर पित्याला मानसिक आणि शारीरिक छळाची पराकाष्ठा करायला लावली आहे.
ज्या पित्याने स्वप्न पाहिले होते की, मुलगा मोठा होऊन आपले पांग फेडेल, त्याच बापाचे हे 'दिवटे' पोर आज समाजाच्या नजरेत 'शिक्षक' म्हणून मानाने मिरवत आहे. याआधीही या नालायकाने बापाचा छळ केल्यावर आम्ही पुढाकार घेऊन त्याला धडा शिकवला होता. त्यावेळी त्याने हातपाय जोडून, शरणागती पत्करून बापाला सन्मानाने वागवण्याची हमी दिली होती. मात्र, लांडग्याचे लक्षण पुन्हा जसेच्या तसे, याने आपल्या नीच वृत्तीला पुन्हा एकदा खतपाणी घातले आहे.
​आता समाज करणार 'न्याय'!
समाजात सूटाबुटात, वर मान करून वावरणारा हा 'नालायक' आता बापाच्या अश्रूंची किंमत मोजायला तयार राहावा. या राक्षसी प्रवृत्तीचा बुरखा आम्ही फाडणार आहोत. बापाची व्यथा मांडणारी हृदयद्रावक 'रेकॉर्डिंग' आम्ही संकलित केली असून, ती केवळ प्रशासनालाच नव्हे, तर आता जनतेच्या न्यायालयातही उघड करणार आहोत.
​या हरामखोर पोराचे कपडे उतरवून त्याला त्याची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे. हा केवळ एका बापाचा लढा नसून, समाजातील 'संस्कारांच्या' रक्षणासाठी दिलेली एक हाक आहे.
​सविस्तर माहिती आणि बापाची रड-कथा जनतेच्या दरबारात मांडत आहोत...!
​- धनंजयबापू सोनार
(लोकहितवादी पत्रकार)
संपर्क: ७९७२८८१४४०

Post a Comment

0 Comments