निवडणुकीनंतर अनेकदा राजकारण थंडावते आणि लोकप्रतिनिधी व जनता यांच्यातील अंतर वाढू लागते. परंतु, या सर्व प्रथेला फाटा देत अमळनेर शहरात एका तरुण आणि तडफदार नगरसेवकाची कार्यशैली सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. ते नगरसेवक म्हणजे भरत ललवाणी.
विजयी झाल्यापासून एका क्षणाचाही विलंब न लावता भरत ललवाणी यांनी थेट प्रभागात उतरून जनसेवेचा वसा घेतला आहे. नागरिकांचा कोणताही फोन असो वा कोणतीही अडचण असो, क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेणे आणि तत्परतेने दखल घेणे, हा त्यांच्या कामाचा स्थायीभाव बनला आहे.
प्रभागातील नागरिकांचे मुख्य प्रश्न—मग ते सांडपाणी व गटारींची स्वच्छता असो, नियमित साफसफाईचा प्रश्न असो किंवा स्ट्रीटलाईट्सचा प्रश्न असो—नागरिकांची कोणतीही ओरड किंवा तक्रार येण्याआधीच किंवा ती येताच ते स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहतात. नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या तातडीने सोडवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्या या धडाडीमुळे प्रभागातील नागरिक कमालीचे समाधानी आहेत.
सध्या अमळनेरच्या राजकारणात विरोधी गटातील अत्यंत सक्रिय आणि सर्वांची मने जिंकून घेण्यात आघाडीवर असलेले दिगंबर महाले आणि भरत ललवाणी ही दोन नावे विशेष चर्चेत असून, त्यांच्या लोकसंग्रहाची सर्वत्र चर्चा आहे.
भरत ललवाणी यांना जनसेवेचा वारसा लाभला आहे यात शंका नाही. त्यांचे वडील, तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व. सुरेश ललवाणी हे आपल्या विकासकामांतून आणि जनमानसातील आदरामुळे 'पाणीवाले बाबा' म्हणून अजरामर झाले आहेत. प्रशासनावर असलेली त्यांची पकड, उत्तम नियोजन आणि सतत जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा त्यांचा स्वभाव आजही अमळनेरकरांच्या स्मरणात आहे.
आज, नेमक्या याच सुसंस्कृत आणि लोकाभिमुख मार्गावर भरत ललवाणी यांची वाटचाल सुरू असल्याचे बोलले जात आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ते जनमानसात आपले स्थान निर्माण करत आहेत.
समन्वय आणि दबावतंत्राचा अचूक समतोल साधने म्हणजे काय हे भरत ललवाणी यांनी दाखवून दिले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भरत ललवाणी हे सत्ताधारी गटात नसले, तरीही प्रभागाच्या विकासाच्या मुद्द्यावर ते कधीही मागे हटलेले नाहीत. प्रशासन, सत्ताधारी गट, संबंधित सभापती आणि नगराध्यक्ष या सर्वांशी योग्य तो समन्वय साधत, आणि जिथे गरज भासेल तिथे प्रशासकीय दबावतंत्राचा अचूक वापर करत आपल्या प्रभागातील विकासकामे मार्गी लावणे, हा त्यांचा एकमेव अजेंडा राहिलेला आहे. राजकारணాपेक्षा जनहित आणि विकास यांना प्राधान्य देण्याची हीच भूमिका त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवते.
एक धडाडीचा, जमिनीवर राहणारा आणि जनतेसाठी २४ तास उपलब्ध असणारा तडफदार नगरसेवक म्हणून लोकांच्या मनात घर केलेले भरत ललवाणी यांना पुढील काळात प्रभागात आणखी प्रभावी आणि दर्जेदार कामे करण्याची शक्ती मिळो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
0 Comments