गणपती हॉस्पिटल अँड क्रिटीकेअरतर्फे भव्य आरोग्य व मार्गदर्शन शिबिर संपन्न..!

अमळनेर येथे गणपती हॉस्पिटल अँड क्रिटीकेअरतर्फे २ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य आरोग्य व मार्गदर्शन शिबिर संपन्न..!

शहरातील सिद्धिविनायक कॉलनी, धुळे रोड, अमळनेर येथील ‘गणपती हॉस्पिटल अँड क्रिटीकेअर’ च्या वतीने त्यांच्या दुसऱ्या  वर्धापनदिनानिमित्त  भव्य मोफत आरोग्य व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

शिबिराची ठळक वैशिष्ट्ये:

  • मार्गदर्शक व तज्ज्ञ डॉक्टर: शिबिरात प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पंकज संतोष महाजन (MBBS, MD) यांनी रुग्णांची तपासणी करून बहुमूल्य मार्गदर्शन केले. ते हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, दमा व श्वसनाचे आजार या विकारांवर विशेष मार्गदर्शन करतात.
  • विशेष सवलत व तपासण्या: ५ हजार रुपयांपर्यंतच्या महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या अत्यंत सवलतीच्या दरात, म्हणजेच फक्त १०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आल्या.
  • प्रमुख तपासण्या: यामध्ये HbA1c, थायरॉईड, रक्तातील कोलेस्ट्रॉल, PFT (फुफ्फुसाची पळक्सन टेस्ट), पीकफ्लो (फुफ्फुसाची पळक्सन टेस्ट), रॅडम शुगर आणि व्हिटॅमिन बी-१२ यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्यांचा समावेश होता. तसेच शिबिरात मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शनही करण्यात आले. गणपती हॉस्पिटल अँड क्रिटीकेअर, सिद्धिविनायक कॉलनी, धुळे रोड, अमळनेर, जि. जळगाव - ४२५४०१ हे रुग्णांच्या विश्वासाचे प्रतीक बनत चालले आहे अशी प्रतिक्रिया अनेक रुग्णांनी दिली. 
  • -धनंजय बापू सोनार 
  • लोकहितवादी पत्रकार 
  • 7972881440

Post a Comment

0 Comments