सामाजिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे आणि अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे उपनगराध्यक्ष प्रशांत मनोहर निकम यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठानच्या सौजन्याने शहरात भव्य अॅक्युप्रेशर, सुजोक आणि कपिंग थेरपी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे भव्य शिबीर २५ जुलै २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत अमळनेर येथील एल.आय.सी. कॉलनीतील ओपन स्पेस येथे पार पडणार असून दररोज सकाळी ८.०० ते १२.०० आणि संध्याकाळी ४.०० ते ८.०० या वेळेत रुग्णांची तपासणी व उपचार केले जातील.
हे शिबीर पूर्णपणे नैसर्गिक व औषधविरहित उपचार पद्धतीवर आधारित आहे. यामध्ये हाताच्या व पायाच्या तळव्यांवरील अॅक्युप्रेशर पॉइंट्सद्वारे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. कोणत्याही प्रकारच्या गोळ्या-औषधांशिवाय आजारांवर मात करण्याची ही नामी संधी असून सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी हे शिबीर पूर्णपणे खुले राहील. प्रख्यात थेरपिस्ट महेंद्र पितानी हे या शिबिरात मणक्याचे आजार, मानदुखी, कंबरदुखी, पाठीचा त्रास, सायटिका, सांधेदुखी, लठ्ठपणा, पॅरालिसिस, थायरॉईड, मधुमेह, ब्लड प्रेशर, डोकेदुखी, ॲलर्जी, दमा, गॅस-अपचन, हातापायाला मुंग्या येणे, पोटरीमधील नस आखडणे, झोप न लागणे तसेच कान, नाक व घशाच्या विविध विकारांवर प्रत्यक्ष नैसर्गिक उपचार करणार आहेत.
शिबिरात उपचारासाठी येताना रुग्णांनी आपले हात आणि पाय स्वच्छ धुवून यावे, तसेच प्रत्येक रुग्णाच्या उपचारासाठी साधारण २५ ते ३० मिनिटांचा वेळ लागणार असल्याने नागरिकांनी वेळेचे नियोजन करून यावे, अशी सूचना आयोजकांनी केली आहे.
या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले असून अधिक माहिती व पूर्व नोंदणीसाठी प्रशांत निकम (९९२३१२०००२) किंवा मनोहर पाटील (९४२१०११४४२) यांच्याशी संपर्क साधावा.
-धनंजय बापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
0 Comments