नेत्या प्रतिभा शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांचे साकडे; लवकरच येणार सविस्तर 'लेखाजोखा'
जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या निष्क्रियतेमुळे आणि त्यांच्या मनमानी कारभारामुळे पक्षात मोठी नाराजी उफाळून आली आहे. याच असंतोषातून आता जिल्हाध्यक्ष बदलण्याची घाई पक्षातीलच काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना झाली असून, यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्याकडे थेट निवेदन देण्यात आले आहे.
स्वतःच्या मस्तीत राहणारे 'निष्क्रिय' जिल्हाध्यक्ष?
संजय पवार हे सध्या स्वतःच्याच रुबाबात आणि मस्तीत वावरणारे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. पक्षाच्या तळागाळातील बांधणीकडे आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप होत आहे. एका बाजूला पक्ष वाढवण्याचे मोठे आव्हान असताना, दुसरीकडे अध्यक्षांच्या निष्क्रियतेमुळे पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याची उद्विग्न भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
पवार यांच्या याच कार्यपद्धतीला कंटाळून पक्षातील एका गटाने थेट वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात एक सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. यात पवार यांच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचण्यात आला असून, पक्षाच्या हितासाठी तातडीने जिल्हाध्यक्ष बदलण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
परंतु प्रतिभा शिंदे यांचेच कार्यपद्धती बद्दल पक्षात मोठी नाराजी असल्याने त्या काय न्याय देणार असाही एक मतप्रवाह आहे.
कुणाला आणि कशासाठी झालीय घाई?
आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अचानक जिल्हाध्यक्ष बदलाची ही घाई नेमकी कुणाला झाली आहे? या पदावर डोळा ठेवून कोण बसले आहे? संजय पवार यांचे नेमके राजकीय 'बॅकग्राऊंड' काय आहे? आणि पक्षांतर्गत वर्चस्वाच्या या लढाईत पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरू आहेत?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि संजय पवार यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीचा व पडद्यामागच्या घडामोडींचा सविस्तर लेखाजोखा घेऊन आम्ही लवकरच येत आहोत...
- धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
संपर्क: 7972881440
0 Comments