‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपच्या चर्चेनंतर भाजप नेते विजय चौधरी यांचा पहिलाच जाहीर सहभाग; जामनेरमध्ये जोरदार स्वागताने विरोधकांच्या भुवया उंचावल्या!
हीवरखेडा जामनेर:
संत श्री संताजी जगनाडे महाराज सभागृह, हिवरखेडा रोड, जामनेर येथे 'तेली समाज पंच मंडळ, जामनेर' यांच्या वतीने तेली समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शैक्षणिक, कला, क्रीडा आणि शासकीय सेवेत निवड झालेल्या तब्बल ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा व समाज बांधवांचा गौरव करण्यात आला. एकीकडे गुणवंतांच्या सत्कारामुळे वातावरण आनंदाचे होते, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चांमुळे हा सोहळा विशेष चर्चेचा विषय ठरला.
अलीकडेच भाजप नेते विजय चौधरी यांनी महिलांबाबत व भाजपसह अन्य महिला खासदारांच्या संदर्भात काढलेल्या गौरवास्पद व 'आदरयुक्त वक्तव्यांची' एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वर्तुळात बरीच खळबळ उडाली, अनेकांच्या पोटात दुखले आणि विरोधकांनी त्यावर भरपूर उलट-सुलट चर्चाही झडवली. चौधरी यांचे राजकीय पद गेले.. पोलिसात तक्रार गुदरली गेली.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते विजय चौधरी यांचा हीवरखेडा (जामनेर) मधील हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रमातील दणक्यात सहभाग ठरला. त्यांच्या या एन्ट्रीने आणि उपस्थितांच्या जोरदार स्वागताने विरोधकांच्या चांगल्याच भुवया उंचावल्या असून, भाजपची 'स्वच्छ प्रतिमा' आणखी उजळ झाल्याने त्यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्यांना या कार्यक्रमातून चोख उत्तर मिळाल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगली होती.
एका ‘लायक’ नेत्याची उपस्थिती आणि जोरदार स्वागत!
तेली समाज आयोजित गुणवंत गौरव सोहळ्यात जामनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. साधनाताई गिरीशभाऊ महाजन यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी व समाज बांधवांनी भाजप नेते विजय चौधरी यांचे अतिशय मनःपूर्वक आणि जोरदार स्वागत केले. महिलांबाबत सदैव आदराची भावना बाळगणारे, महिला खासदारांचा नेहमी 'सन्मानपूर्वक' उल्लेख करणारे, मितभाषी आणि महिलांच्या उन्नतीसाठी नेहमी झटणारे भाजप नेते विजय चौधरी या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने सोहळ्याची रंगतच वाढली.
"गुणवंतांच्या सत्कार आणि सदिच्छा सोहळ्यात एका खऱ्या अर्थाने 'लायक' नेत्याची उपस्थिती अत्यंत लक्षवेधक ठरली," अशी खुली दाद यावेळी उपस्थितांनी दिली. जनमानसात आणि समाजकारणात महिला सन्मान करणाऱ्या नेत्याची किंमत काय असते, हे या सोहळ्यातून दिसून आले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या प्रेरणादायी सोहळ्याला जामनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. साधनाताई गिरीशभाऊ महाजन, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौधरी, अनिल पाटील सर यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
तसेच तेली समाज पंच मंडळ जामनेरचे अध्यक्ष श्री. सोपान चौधरी, उपाध्यक्ष निखिल भोलाने, सचिव रामेश्वर पाटील, सुरेश तेली सर, पप्पू चौधरी, मुकेश चौधरी आणि जामनेरचे सर्व आदरणीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"तेली समाज संघटन हाच आपला संकल्प!" या दृढ निश्चयाने पार पडलेला हा सोहळा अनोखा होता. परंतु यात निमंत्रित भाजप नेते विजय चौधरी यांचीच चर्चा सध्या संपूर्ण राज्यात रंगली आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments