बेकायदा कामाने जीव घेणारा ठेकेदार शाह विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा..

बेकायदा कामाने अनेकांचे जीव घेणारा ठेकेदार अद्याप मोकाट का?
अखेर अवैध कामांचा  खलनायक उमेश शाह विरुद्ध कारवाई साठी आंदोलनाचा इशारा.
गौण खनिज उपसा व वाहतूक सह बोगस बांधकामाचा खलनायक उमेश शाह याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून चालणार नाही तर त्याचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून जेल बंद करावे या मागणी साठी अन्याय अत्याचार विरोधी समितीचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे धरण्यात येणार आहे.
समिती अध्यक्ष व पत्रकार धनंजय सोनार यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देवून या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले.
उमेश शाह बोगस कामे करून मलिदा लाटणारा ठेकेदार म्हणून चर्चेत आहे. नुकत्याच 80फुटी रोडवरील निकृष्ट बांधकाम तसेच झालेल्या नुकसानी सह एका मृत्यू प्रकरणी उमेश शाह याचे बांधकामातील काळे कृत्य चर्चेत आले होते.
उमेश शाह याचे बद्दल प्रशासन गप का,? अद्याप कोणतीही कारवाई का झाली नाही, कुणाचा राजकीय आशीर्वाद या बेजबाबदार ठेकेदाराला आहे या बादल देखील तक्रार करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांचे सह वरिष्ठ अधिकारी वर्गास पात्र दीले गेले आहे.
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440

Post a Comment

0 Comments