राजकुमार छाजेड यांच्यावर दाखल अनेक गुन्ह्यांची पार्श्वभूमी पाहून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अजय भामरे यांचे कडून पोलिसांना निवेदन.
येथील ‘लेखन मंच’चे कार्यकारी संपादक तथा दैनिक ‘शौर्य मराठी’चे तालुका प्रतिनिधी अजय भामरे यांच्या तक्रारीवरून ‘सचोटी’ न्यूज चॅनलचे संपादक राजकुमार छाजेड यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार छाजेड यांनी जातीवाचक शब्दांचा वापर करून शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
अजय भामरे यांच्या तक्रारीनुसार, माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवल्याच्या कारणावरून राग आल्याने छाजेड यांनी कथितरीत्या जातीवाचक शब्दांचा वापर करून शिवीगाळ आणि धमकी दिली. तसेच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याने मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही भामरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. यासंदर्भात यापूर्वी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार केल्याचे तसेच छाजेड यांचेवर राजभर अनेक गुन्हे दाखल असल्याचे निवेदन त्यांनी दिले असल्याचे सांगितले.
शिविगाळ प्रकरणी राजकुमार विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३५१(२) व ३५२, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ मधील कलम ३(१)(p), ३(१)(q), ३(१)(r), ३(१)(s) व ३(२)(va) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते करीत असून भामरे यांनी त्यांची भेट घेवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक स्तरातून होत आहे.
राजकुमार छाजेड यांच्याविरुद्ध यापूर्वी अमळनेरसह पुणे, चिपळूण, रत्नागिरी यांसारख्या शहरांत आणि राज्यभर फसवणूक व अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन छाजेड यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी अजय भामरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केल्याचे त्यांनी 'लोकहितवादी'कडे बोलताना सांगितले.
सध्या पोलीस या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात आणि पुढील कारवाई कशी होते, याकडे सर्व पत्रकार व समाजाचे लक्ष लागून आहे.
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
0 Comments