अक्षय मुहूर्त साधून घरगुती गॅस सिलेंडरवर ताबा!

निवडणूक व यात्रा काळात संधी साधू लोकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा केलाय साठा!
पोलीस व प्रशासन निवडणूक तसेच यात्रा उत्सवात व्यस्त असल्याने संधीचा फायदा घेऊन घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. 
व्यापारी कामासाठी स्वस्त दरातील सिलेंडर घेऊन होणारा गैरवापर रोखायची जबाबदारी पुरवठा विभागाची असून पुरवठा अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात बिझी असल्याचे कारण दिले जात आहे! 
गरजू लोकांना मात्र वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसताना गैरवापर करणाऱ्या वाहन चालक, हॉटेल व्यावसाईक व अनेकांना मात्र सहज सिलेंडर कसे उपलब्ध होते? हा प्रश्न उपस्थित होत आहे. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments