■ 'त्यांनी' तुम्ही कमळ चिन्हावर लढून देखील हातात मात्र 'घड्याळ' बांधले होते! तुमचा केसाने गळा कापला!
■तुम्हास 'त्यांनी' जात पाहून त्यांच्या 'जातीशी' मात्र 'छुपी-युती' केली होती. तरीही तुम्ही या निवडणुकीत जात न पाहता केवळ पक्ष निष्ठा म्हणून कमळ हातातून पडू दिले नाही. कारण काय!
■तुमची व फडणवीस यांची मैत्री तसेच कमळाशी निष्ठा मान्यच पण तुम्हास अमळनेर मतदार संघातील भाजपा नेत्यांनी 'त्या' वेळी धोका दिला याची आठवण नाही का दादासाहेब?
■ तुमचेच कट्टर समर्थक आता कमळ विरोधी प्रचार करून मशाल हाती घेत असल्याचा राग तर नाही ना?
■दादा, तुम्ही पुन्हा आमदार झाला असता पण 'यांनी' सोबत राहून घात केलाय.. दगा दिलाय.. हे जनतेने व तुम्ही देखील पाहिले. याचा बदला न घेता तुम्ही त्यांचाच प्रचार का करताय? हा आमचा सवाल आहे, राग आहे!
■दादा, कदाचित ही तुमची राजकीय खेळी असेल, किंवा देवेंद्र यांचेशी असलेले मित्र प्रेम!
आम्ही मात्र आजही तुमच्या सोबत आहोत, राहू!
तुमचे समर्थक म्हणून आमचे काम मशाल हाती घेऊन तुतारी वाजवायचे! हा 'पण' आहे!!
■ दादासाहेब, आपण 'त्यांचा' मनापासून प्रचार करीत असून देखील तुमचा त्यांनी कुठे उल्लेख केला? बॅनर वर फोटो देखील टाकला नाही. तुम्हास टाळत आहेत...
म्हणून
आता आमचं ठरलंय...
आम्ही तुमचे वर झालेल्या अन्यायाचा बदला घेणार!
शिरिषदादासाहेब तुम्हास राग आला तरी चालेल
पण आम्ही तुमचेच प्रेमासाठी
'मशाल प्रज्वलित' करणार!
【*शिरिषदादा मित्र परिवारातील कार्यकर्त्यांची त्यांची भावना व मनोगत लोकहितवादी कडे व्यक्त केले.. ते तसेच्या तसे जनतेस समर्पित!】
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440





0 Comments