गत वेळी निवडणूक येताच पारोळा तामसवाडी येथील निवृत्त पोलीस अधिकारी साहेबराव पाटील यांनी अचानक अमळनेर गाठून जोरदार तयारी केली, खूप आश्वासने दिलीत, कार्यकर्ते व काही पत्रकारांची खुशामत देखील केली, मतदारसंघात पायपीट केली व 'आपणच भावी आमदार आपल्यालाच तिकीट मिळणार' या थाटात 'कमावलेले' 5 पंचवीस लाख उडविले देखील. पण फॉर्म न भरताच त्यांचे 'पार्सल' अमळनेरातुन रवाना झाले. लोकहितवादीने त्यांचे विरोधात त्या वेळी जोरदार आघाडी उभी केली होती!
आता सबंध आयुष्य गुजराथ मध्ये घालविलेले व 'झाडीची' आठवण आलेल्या प्रकाशभाई पाटील यांनी रोजगार देण्याच्या निमित्ताने आघाडी उघडली आहे. त्यांचा डोळा विधानसभेवर आहे!
हयात गुजराथ मध्ये गेली तो पर्यंत जन्म भूमीची यांना कधी आठवण आली नाही आता त्यांना अचानक अमळनेरचा कळवळा का दाटून आला?
तोवर तुम्ही करीत रहा खर्च!!
आम्ही अमळनेरकर आता शहाणे झालो असून कुठले पार्सल कुठे पोचवायचे यात तरबेज झालो आहोत. अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांनी लोकहितवादीशी बोलताना दिली आहे.
पुढील भागात..
प्रकाशभाई यांची 'गुजराथी कमाई' व लेखाजोखा! खरे तर श्वेत पत्रिका!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments