मोफत राशन योजना असून देखील हमाली, मोबाईल, अन्य खर्च लागतो असे सांगून लाभार्थींना 20 ते 50 रुपयात चुना लावून फसवणूक झाल्याची तक्रार लोकहितवादीला प्राप्त झाली आहे.
फ्री याचा अर्थ फ्री असाच होतो. एक रुपया देखील घेतला जाऊ नये. पण सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानात घेतलेले धान्य महागात पडत असून देखील पुरवठा विभाग कोणतीही कारवाइ करताना दिसत नाही.
केन्द्र शासनाने मोफत शिधा द्यायची योजना सुरू केली असून जे दुकानदार लाभार्थींना लुबाडत आहेत त्यांनी पुरवठा विभागास तक्रार द्यावी किंवा पाठपुरावा करण्यासाठी लोकहितवादीला आपली तक्रार द्यावी असे आवाहन करीत आहोंत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972871440

0 Comments