संपूर्ण हयात गुजरातमध्ये गेली, कधी 'झाड-पाला' ज्यांना माहीत नहोता त्यांना अचानक मातृभूमीचे ऋण फेडायची इच्छा झाली आणि ते एका बाबाला घेऊन अवतरले... जोरदार कार्यालय उद्घाटन, रॅली, पत्रकार परिषद, सोनपापडी व सुरती चिवडा वाटप.. व अर्धे गुजराथी बोलत 'अमुक-ढमुक' असे सांगत रोजगार देण्याची भाषा.. त्यांचे गुजराथला 'धंदे' आहेतच.. त्यात थोडासा रोजगार द्यायची तयारी त्यांनी केली देखील आहे,. पण भाई, इतके दिवस अमळनेरात 'अंधार' असताना तुम्ही कुठे 'प्रकाश' टाकत होता,?
असेही अमळनेरकर आता 'उसन्या निवत्याला' भुलणार नाहीत. हे पक्के ध्यानात ठेवा,.
न फुटणारे लाडू खाऊन पोट व दात दुःखी वाढवायची आता आमची तयारी नाही, इतके दिवस कुठल्या 'झाडीत' लपून बसला होता? किती लोकांना रोजगार दिला? ज्यांना तुम्ही रोजगार दिला असे झाडी या तुमच्या गावातील पाच दहा लोकांची नावे जरी सांगितली तरी चौकात पाय धरू..!
भाई , तुम्हास निवडणुकीत राजकीय पक्षाचे तिकीट तर मिळणार नाही, चुकून मिळालेच तर मुंबई प्रवासाला देखील पैसे उरणार नाहीत.. हे अमळनेर आहे अमळनेर!
आता आयत्या वेळी येऊन आश्वासनांची खैरात वाटणाऱ्याला अमळनेर मतदार संघात संधी नाहीच! असे अमळनेरात चौका चौकात बोलले जात आहे. ही लोकचर्चा व तुमच्याच जवळील एकाची प्रतिक्रिया लोकहितवादीस मिळाली आहे. कृपया समजून घ्यावी भाई!!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments