अजितदादा यांना घरी बोलावून 'तिर्री' देणारे कृषिभूषण आजारी असल्याचे त्यांचे परिवाराने सांगितले होते.
त्या पूर्वी ना.अनिलदादा यांचे सोबत 'धुळे व राजवड' सेटिंग झाल्याच्या जोरदार चर्चा झाल्या, त्या नंतर खा.सुप्रिया सुळे अमळनेर येथे येणार हे पाहताच रस्तोरस्ती कृषिभूषण साहेबरावदादा व सचिन बाळू पाटील यांचे बॅनर झळकले...
अनिलदादा व अजित दादा यांना सोडचिठ्ठी देत साहेबरावदादा शरद पवार यांचेच सोबत असून तुतारी तेच फुंकणार असा संदेश या निमित्ताने गेला..
पण, साहेबराव या कार्यक्रमात देखील अवतरले नाहीत.
सर्वाना हो म्हणायचे आणि खेळवायचे धोरण आहे की मनात दुसरेच? फोटो लावायची परवानगी त्यांनी दिली की परस्पर फोटो लावले ? बॅनर साठी फंड कुणी किती दिला?
दादा नक्की कोणत्या दादांचे सोबत? की अपक्ष लढून 'पिपाणी' वाजवणार? दादा आपले कार्ड ओपन करीत नसल्याने अमळनेर मतदार संघात रंगतदार चर्चा सुरू आहेत!
तालुक्यात मोठा जनाधार असलेले कृषिभूषण 'रमी' कधी 'शो' करणार? लोक वाट पाहत आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments