स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे मशाल रॅली

मंगल रॅलीने वेधले अमळनेरकरांचे लक्ष! शेकडो नागरिकांचा उत्फुर्त सहभाग! 
दरवर्षी प्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात १४ रोजी रोत्री मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे मशाल रॅली काढण्यात आली.
     मंगळ ग्रह मंदिरापासून ते सुभाष चौकापर्यंत निघालेल्या या रॅलीचा प्रारंभ रात्री १० वाजता झाला. प्रारंभी राणी लक्ष्मी चौकात हुतात्मा स्तंभास अभिवादन व माल्यार्पण करण्यात आले. 
संस्थेचेअध्यक्ष डिगंबर महाले यांचे मार्गदर्शनाखाली  उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, सेवेकरी आर. टी. पाटील, पुषंद ढाके, राहुल पाटील, शरद कुलकर्णी आदींनी हातात तिरंगा ध्वज व पेटती मशाल घेतल्या होत्या. ‌
‘भारत माता की, जय...‌’, ‌‘वंदे मातरम्‌‍...‌’ आदी घोषणांनी सेवेकरांनी परिसर दणाणून गेला होता. देशभक्तीपर गितांमुळे परिसर चैतन्यमय झाला होता. रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पू. सानेगुरूजी, सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले .रात्री ठिक १२ वाजता ध्वजारोहण होऊन राष्ट्रगिताने रॅलीची सांगता झाली.
मंगळग्रह मंदिराचा हा अभिनव देशभक्तीपर उपक्रम जनतेचे लक्ष वेधणारा ठरला!!
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments