विखुरलेल्या,
विसरलेल्या!
टाळणाऱ्या,
टोलविणाऱ्या!
मागणाऱ्या,
मारणाऱ्या!
खाजविणाऱ्या,
खाजवू देणाऱ्या!
रडणाऱ्या,
रडविणाऱ्या!
आग लावणाऱ्या;
फूट पाडणाऱ्या;
जोडणाऱ्या!
फसविणाऱ्या:
बुडविणाऱ्या:
तारणाऱ्या;
संकटात धावणाऱ्या:
फसलो बघून पळणाऱ्या!
गरजे पुरते बोलणाऱ्या,
मगराचे अश्रू वाहणाऱ्या!
मित्रा साठी लढणाऱ्या,
घाव अंगावर झेलणाऱ्या!!
तमाम मित्रांची
हृदयपूर्वक आठवण!
मैत्री दिवसाच्या शुभेच्छा!!
मित्र कसेही असोत,
ते गोडच असतात.
भांडून यार गेला
नाही रगेल तो,
लक्षात चूक येता
मागे वळेल तो!
खांद्यावरून त्याच्या
जाईन एकदा मी,
घ्या सावरून त्याला
जेंव्हा रडेल तो!
पुनश्च सर्व मित्रांची आठवण व शुभेच्छा.
-धनंजय सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440


0 Comments