अनिलदादा व आमची ही सदिच्छा भेट होती, कोणत्याही प्रकारचे राजकीय बोलणे झाले नसून अफवा पसरवू नका, मी 9 ऑगस्ट रोजी माझी भूमिका स्पष्ट करणार असून मायबाप जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे कृषिभूषण साहेबरावदादा पाटील यांनी लोकहितवादीला प्रतिक्रिया देताना सांगितले.
साहेबरावदादा यांचे मनात आणखी काय आहे? हे 9 ऑगस्ट ला समजेल पण तूर्तास अनिलदादा व साहेबरावदादा यांच्या भेटीच्या बातम्या मात्र तर्क वितर्कास मोठा वाव देणाऱ्या ठरल्या आहेत.
9 ऑगस्ट रोजी दादा पुन्हा अनिलदादा विरोधात भूमिका मांडणार की नवा फंडा जाहीर करणार हे समजेलच!
आज अनेकांनी कृष्णाई हॉटेल ते गृह भेटी बाबत ज्या बातम्या प्रसूत झाल्या त्या मुळे मात्र जिल्हाभर खळबळ उडाली हे नक्की!
9 ऑगस्ट ची जनतेला प्रतीक्षा आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments