अनेक महिने विजनवासात राहून शबरी फार्म वर चिंतन करणारे माजी आमदार कृषिभूषण साहेबरावदादा यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेत गाठी भेटी सुरू केल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत आपणच दावेदार म्हणून चक्क दंड थोपटून ना. अनिल भाईदास पाटील यांना थेट आव्हान दिले, जाहीर टीका देखील केली.
आपण केलेल्या विकासकामांची रोज नवी जंत्री मांडून दबदबा निर्माण केला, खरे तर त्यांची कार्यशैली व विकासासाठी असलेल्या दूरदृष्टीने प्रभावित अमळनेरकर आनंदी झाले होते व आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शिरिषदादा चौधरी, कृषिभूषण साहेबरावदादा व अनिलदादा यांचेतच लढत होईल असे बोलले जाऊ लागले असताना कृषिभूषण साहेबरावदादा यांचें मन वळविण्यात अखेर अनिलदादा पाटील यांना यश आल्याचे दिसत आहे.
मागच्या दारातून विधानपरिषद देऊ हे प्रलोभन मिळाले की नगरपालिका पुन्हा दादांना सोपविण्यात मदत करू असा शब्द घेतला म्हणून कृषीभूषण दादांनी यु टर्न घेतला?
हा शोधाचा विषय आहे.
तूर्तास पाडळसरे धरणासाठी एकत्र आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या आधी अनिलदादा यांचे साठी त्याग करणाऱ्या कृषिभूषण दादांनी कोणत्याही कारणे असू देत पण पुन्हा एकदा त्याग केल्याने पंचक्रोशीतील जाणकारांना धक्का बसला आहे.
या दोन महाशक्तीच्या युतीला काँग्रेसनेते संदीपराजे घोरपडे, डॉ.अनिल शिंदे, के डी पाटील हे छेद देणार का ? की माजी आमदार शिरिषदादाच भेदणार चक्रव्यूव्ह?
उद्या सविस्तर!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments