कोणताही अधिकृत परवाना नसताना अनेक वर्षे दैनिक वास्तवता हे नाव देत स्वयंघोषित वास्तवतावादी संपादक व कार्यकारी संपादक यांनी न.प., कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकी संघ, प्रताप महाविद्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, जी प सिंचन, पंचायत समिती, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय सह विविध शासकीय आस्थापना व शाळा/ कॉलेज, खाजगी संस्था यांचे जाहिराती प्रसिद्ध करून लाखो रुपयांची मिळकत केली.
खोटे वृत्तपत्र प्रसिद्ध करणे हाच मुळात अपराध आहे. त्यावर कडी म्हणजे शासकीय दरात जाहिरातीची रक्कम (कॉलम/सेंटीमीटर) बिनदिक्कत वसूल करण्यात आली. अनेकांनी चेक ने बिल अदा केले असून त्यांचे त्या काळच्या ऑडिट मध्ये स्पष्ट नोंद आहे. जी माहिती सर्वज्ञात असून आम्ही पुराव्या साठी काळजीपूर्वक जतन करुन ठेवली आहे.
ज्यांनी खातरजमा न करता या खोट्या वृत्तपत्रात जाहिराती दिल्या, त्यांना देयक अदा केले ते अधिकारी/प्राचार्य/चिटणीस/लेखापाल वा अन्य संबंधित या सर्वांचे विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून लोकहितवादी पत्रकार धनंजय सोनार यांनी संबंधित न्याय यंत्रणेकडे तक्रार गुदरली आहे.
कुणीही उठावे आणि कोणत्याही नावाने वृत्तपत्र सुरू करून शासनाची आर्थिक लूट करायची हा गंभीर अपराध आहे. यांचे वृत्तपत्रात प्रसिद्ध निविदा/ वा अन्य जाहिराती मुळे अनेकांच्या निविदा मंजूर झाल्याचे दप्तर आमचे कडे आहेच!
या संपादक व कार्यकारी संपादक यांचे सह सर्व संबंधित अधिकारी, लेखापाल यांचेवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी लावून धरणारे धनंजय सोनार यांनी स्पष्ट केले आहे की , "जाहिरात देणारे, देयक मंजूर करणारे, देयक अदा करणारे विद्यमान असोत, त्यांची बदली झालेली असो की निवृत्त झाले असो त्यांचेवर गुन्हा दाखल होऊन दंडात्मक कारवाई व्हावी!"
या दोन्ही संपादक /कार्यकारी संपादक व अधिकारी यांचे संगनमत असल्याने जनतेची व शासनाची फसवणूक झाली असून हा 35 ते 38 लाख रुपयांपेक्षा मोठा फ्रॉड असल्याने शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे.
■आगामी आकर्षण■
रातोरात वृत्तपत्राचे नाव कसे व का बदलले? कुणी केली मदत?
सविस्तर उद्या!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments