अमळनेरचे आमदार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिलदादा यांचे आजूबाजूला नेहमी वावरणाऱ्या एक दोघांचा अतिरेकी हस्तक्षेप असल्याचा अनुभव आल्याने अनेक पत्रकार व राजकीय नेते, कार्यकर्ते हातचे अंतर ठेवून वागत असल्याचे दिसत आहे. तशी त्यांनी थेट कैफीयतच आमचे कडे मांडत सांगितले की तुम्ही दादांच्या कानावर हा विषय घाला...
खरेतर अनेकांनी त्यांचे पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला देखील पण दादांनी मनावर घेतले नसल्याने लोकांनी लांब राहणे पसंत केले आहे. तर अनेकांच्या बद्दल या दोघांनी दादांचे कान भरल्याने दादांनीच त्यांना अंतरावर उभे केले असा समज देखील पसरला आहे.
दादा, तुमचे त्यांच्यावर प्रेम असेल ते कायम राहू द्या पण इतरांचे बद्दल ते काड्या करीत असतील तर त्यांचा नक्की हेतू देखील समजून घेतला पाहिजे. कुणाचे समाजात किती वजन आहे हे ठरविणारे हे काय 'वजन माप निरीक्षक' म्हणून तुमचे सोबत ठेवले आहेत की 'राजकीय अभ्यासक' म्हणून यांची 'पीएचडी' झाली आहे? हे समजून घ्यावे.
त्या एका-दोघांचे अति लाड-कोड करताना 50 लोक तुमचे पासून दुरावत आहेत, निवडणूक तोंडावर आहे लोक तोंडावर बोलत नाहीत.. एक माणूस हजार लोक तोडू शकतो.. रात्र वैऱ्याची आहे...
खरे तर हे प्रत्यक्ष येऊन सांगायचे होते पण ते तुमचे आजूबाजूला असल्याने व तुम्ही त्यांचेच ऐकत असल्याने भेटता आले नाही.
पण तुमच्यावरील प्रेमापोटी शेवटी हे जाहीर आवाहन करावे लागले! त्या बद्दल माफी असावी!
सदैव तुमच्या हितासाठी जे काम करतात, शुभ चिंतितात त्यांचे विनंतीवरून सदर जाहीर आवाहन करीत आहोत.
माझेही प्रेम आहेच, आपले कडून देखील अंतर पडू नये ही विनंती. त्यांनाही तोडून फेका असे अजिबात हेतू नाहीत पण सर्वाना समान न्याय द्यावा हिच अपेक्षा.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments