काही असतात खाकीतले हरामखोर त्यांना कायद्याने धडा शिकवायला हवाच,पण जे अहोरात्र परिश्रम घेतात त्यांचे कौतुक केलेच पाहिजे!
तहान लागली की पाणी तशी पोलीस व मिल्ट्रीची गरज पडते.. त्यांचे उपकार विसरू नका. जाणून घ्या वर्दी कुठे कशी कामात येते ते...
सोनं, गाडी, पैसे, अपहरण, अपघात, बलात्कार, विनयभंग, विष प्राशन, फाशी, हत्या, खून, आत्महत्या, आग लागली किंवा
दिवाळी, दसरा, होळी, रंगपंचमी, मोहरम, ईद, महापुरुष जयंती पुण्यतिथी, गणपती, आली की पोलीस हवेतच!
इतक्यात थांबत नाही,
मंत्री, संत्री, राजकीय नेते, विरोधी पक्ष नेते, माजी आजी नेते, सामाजिक कार्यकर्ते वा त्यांचे समर्थक आले की पोलीस हवेतच!!
इतकेच नाही तर,
बँक ड्युटी असो वा नदी नाल्यास पुर आला असो, परीक्षा असो वा अवैध धंदे बद्दल तक्रार असो पोलीस रोडवर उभेच दिसतात!
आपसात असो की कुटुंबात, हॉटेल मध्ये असो की रस्त्यावर वाद/भांडण झालं की पोलीस हवेतच! जातीवाद झाला, व्हाट्सएपवर विघातक पोस्ट केली, दंगल झाली, जंगली प्राण्याचा हल्ला झाला की पोलिसांनाच त्रास!
एखादा आरोपी फरार असो की कुणी लाच घेतली, हुंड्यामुळे लग्न तुटलं, सासरचा त्रास, नवरा-बायकोचे लफडे, खून, दरोडे, अनैतिक संबंध, रोड रोमियो, मोर्चा,आंदोलन, हाॅटेलात मटणाच्या जागी कुत्र्याचं मटण सापडलं, कुत्रा/पोपट मारला, गाय बैल चोरी झाला की पोलीस पाहिजेच!
ऑनलाइन फ्रॉड, खिसा कापला, बँक फसवणूक, व्यापारी वर्गाने फसबिले, चेक बाऊन्स, सावकारी अशा ठिकाणी पोलिसच!
जास्त ऊन्ह पडले, अतिवृष्टी वा थंडी पडली, साथीचा आजार आला तरी पोलिसच मैदानात!
शनिवार + रविवार सर्वांना सुट्टी पोलीस मात्र ड्युटी वर
सट्टा/मटका/जुगार/दारू/ पत्ते/भांग, गांजा, विमल, भेसळ सर्व ठिकाणी पोलीस हवेतच!
मोर्चा, उपोषण, आंदोलन, निवेदन असले तरी पोलीस हवेतच! रस्ता माहीत नाही, रत्ता चुकला, गाडी हरविली, बायको, मूल, बाप हरवला तरी गरज पोलिसाची!
टपाल ड्युटी, मतदान ड्युटी, आरोपी ड्युटी, पी एम ड्युटी, अश्लील फोटो + माहीती पसरली तर पोलीसच कर्तव्यावर!
अशा शेकडो कामात पोलीस असतात.. सण असो की लग्न पोलिसांना घरी जाता येत नाही, दिवाळीत लोक मजा करीत असताना पोलीस मात्र जनतेच्या रक्षणासाठी उभे असतात!
कुठलंही काम अडलं तर मदतीसाठी फक्त एक आणि एकचं नांव आठवते ते म्हणजे पोलीस... मग पोलीसांची मदत कोण करेल ?
👉🏾त्यांना जीव नाही ?
👉🏾 घर नाही का?
👉🏾 कुटुंब नाही ?
👉🏾 ते थकत नाहीत का?
👉🏾 ते आजारी होत नाहीत का?
👉🏾 त्यांना मुलं-बाळं काही नाही का?
👉🏾जास्त केस मोठे नको
👉🏾रोज दाढी केलेली हवी
👉🏾 दिवाळीला बोनस नाही
👉🏾 राहायला योग्य क्वाॅर्टर्स नाही जे क्वाॅर्टर्स आहे तर खुप लहान व सुविधा नाहीत
👉🏾वर्षात ४५ दिवस अर्जित रजा ती पण वेळेवर नाही
👉🏾 वर्षात १२ दिवस रजा ती पण वेळेवर नाही
👉🏾 वेळेवर साप्ताहीक सुट्टी पण नाही
👉🏾 इतरांची ड्युटी ८ तास आणि पोलीस २४ तास
👉🏾मेडिकल रजा मिळत नाही
👉🏾 इतरांची संघटना आहे म्हणुन मागणी लवकर पुर्ण होते पण पोलीसांची संघटना नाही.
मित्रहो, पटले तर समर्थन द्या!
जे बोटावर मोजता येतील असे नालायक, लाचखाऊ व नीच पोलीस असतीलही, पण अधिकतर आपले रक्षक आहेतच!
आपणास हे पटले असेल तर शेअर करुया आणि इतर जनतेलाही पोलिसांबाबत जागृत करुया.
पोलीस आपला रक्षक
त्याचे हितासाठी उभे राहूया!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments