प्रा. अशोक पवार यांनी तीन दादांना दिलेल्या आव्हाना नुसार कृषिभूषण साहेबरावदादा यांनी हे जाहीर आव्हान स्वीकारले होते.
त्या नुसार आता 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी जाहीर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे!
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी हे आव्हान स्वीकारले असल्याने जर साहेबरावदादा आले तर
प्रा. अशोक पवार व काँग्रेस नेते संदीपराजे घोरपडे हे ज्या दादांशी वैचारिक कुस्ती खेळू इच्छित आहेत ती पाडळसे धरणाचा सत्य इतिहास बाहेर आणणारी ठरणार आहे!
पण आयत्या वेळी कोणताही दादा या चर्चेस उपस्थित राहिला नाही तर प्रा. अशोक पवार व संदीपराजे घोरपडे यांची सरशी होण्याची शक्यता जास्त आहे!
कृषिभूषण दादांनी स्वतः फोन करून आव्हान स्वीकारले असे कळविले असल्याने हा कलगीतुरा रंगेल असा कयास आहे.
पण आयत्या वेळी माजी आमदार शिरीषदादा व नामदार अनिलदादा हजर झाले तर या कलगीतुऱ्यास अधिक रंगत येऊन पाडळसरे धरण विषयावर अधिक सत्य लोकांना कळू शकते.
नागरी हित दक्षता समितीने ही जाहीर चर्चा आयोजित केली असून लोकांना उत्सुकता लागून आहे की नक्की कोणते दादा येणार व काय भूमिका मांडणार?
सानेगुरुजी विद्यालय प्रांगणात होणारी ही जाहीर चर्चा आता तरी चर्चेचा विषय झाली आहे!
तूर्तास प्रा अशोक पवार तुतारी वाजवीत व संदीपराजे घोरपडे हे हात बळकट करीत या महत्त्वाच्या विषयामुळे प्रत्येकाचे ओठावर आहेत!
हिंदीत सांगायचे तर सुरखींयोमे आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments