अनावश्यक विषयात 'अवास्तव' तोंड खुपसणारे झालेत टीकेचे धनी!

सर्वत्र होतेय छि थु तरी यांना लाज नाही!! 
'निर्लज्जनाय ना भयम् ना लज्जा' अशी यांची गत झाली असून रोज फुकटची दारू व मासे मिळावेत म्हणून यांची दिवसभर फिल्डींग लागत असते, ज्याचा वाढदिवस त्याचे दारात यांची हजेरी, विशेष म्हणजे तिथलाच पुष्पगुच्छ उचलून फोटो काढायचे,,... समोरचा येणार असेल तर ठिकाण ठरवून ऑनलाइन की ऑफलाइन? अशा कानगोष्टी करून पार्टी साठी बिदागी घ्यायची व निघायचे दरबारात! 
आज 8 लोक आहेत 10 लोक आहेत असे सांगून तीन चार किलो मासे जास्त टाकून हॉटेल मालकाकडे जमा ठेवायचे म्हणजे 2 दिवस 'बकरा' सापडला नाही तरी चालेल... सोय होऊन जाते! 
मग मागून-पुढून हवेत धुर् सोडत (अलीकडे सोडत नाही म्हटले!) अवास्तव कुटाणा करायचा व बिल माथी मारून वाट धरायची हा शिरस्ता असलेल्या जोडी मूळे लोक संभ्रमात असून सारेच एका माळेचे मणी आहेत की काय म्हणून सामान्य जनता सर्वांना एका तराजूत तोलत आहे. त्या कारणे इतरांची देखील बदनामी होत असल्याने बहुतेक  'कलम'गार  चिडणे स्वाभाविक आहे.
एका 'महनीय' व्यक्तीकडे रोज उष्टे हुंगायला जायची 'चाकरी' करणारे, कुणाला जाहिरात द्यायची? कुणाला किती पाकिट द्यायचे? कुणाला आधी बातमी द्यायची? कुणाला बोलवायचे याचा निर्णय देखील हेच घेतात म्हणे!
लोक अत्यन्त खालच्या पातळीवर टीका करतात आणि हे केवळ  'साहेबांच्या' बाजूला बसायला मिळते म्हणून हे मात्र खुश होतात. 
अरे$$ थु$$$ अशा जिंदगीवर!! 
-------
■आगामी आकर्षण■
【लवकरच नवा विषय घेऊन】
दोन दिवसांची मजा आहे लेकानो$$ नंतर 'माशाच' मारत बसायचे आहे! थोडा सब्र करो!!!
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7973881440

Post a Comment

0 Comments