त्यांनी वाढविले म्हणून आम्ही वाढत आहोत. त्यांचे अनंत उपकार आहेत. पितृ पक्ष हे निमित्त असले तरी त्यात असलेल्या अंधश्रद्धा बाजूला सारून किमान वर्षातून एकदा आपले दिवंगत वाड-वडील यांची आठवण करीत परिवारात त्यांचे स्मरण केले जाणे अपेक्षित आहे.
काळाचे ओघात आपण विसरत राहतो, वर्षभरात एकदा तरी आठवण काढून त्यांच्या आवडत्या भाज्यांचा आस्वाद घेत आपण खरे तर त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतो.
या निमित्ताने एक दोन वा अनेक पितर म्हणून नातलग वा कुणास बोलवतो, त्यांचे सोबत संवाद होतो, संबध रिनियुल (रिचार्ज) होतात.
पितृ पक्षातच केले पाहिजे असे नाही, कधीही करता येईल.
पण बामनाला दे, गाईला दे, कावळ्याला दे म्हणत, फसववणूक करून लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेणाऱ्या लोकांना दान दे असे न करता मस्त सर्व आवडीचे पदार्थ करून प्रसन्न मनाने भोजन ग्रहण करावे, आठवणी काढाव्या, पितरांचे म्हणजे वाड-वडील यांचे किस्से आपल्या नव्या पिढीला सांगावेत.. ही झाली कृतज्ञता!
ज्यांना शक्य आहे त्यांनी गरीब गरजू मुलांना जेवण/ त्यांना आवश्यक साहित्य देता येईल. झाडे लावता येतील..
ऐपती नुसार पितरांचे स्मरणार्थ काही चांगले उपक्रम राबविता येतील.
आम्ही आमच्या पितरांची आठवण आमचे ऐपती नुसार आज अशीच करीत आहोत.
त्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी आहे! मी आज दोन गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य घेऊन दिले! वाचावे लिहावे असे सांगणारे माझे वडील व ज्यांनी खूप गरिबीत मला अमळनेरची वाट मोकळी करुन मोठे केले त्या रेणूबाई खरोटे, व बाळासाहेब खरोटे यांना नक्की माझे प्रेम पोचले असेल!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments