अमळनेर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून पक्ष श्रेष्टी कडे अर्ज दाखल करताना कधी स्वतःस कधी साहेबराव दादास, उमेश पाटील यांना समर्थन देणारे एका वेळी एकत्र आले.
हा योगायोग की नवीन गट बंधन?
तिलोत्तमाताई यांचे जिल्हा परिषद जागे सह पंचायत समिती सदस्य होण्यासाठी मारामार सुरू असताना त्या थेट विधानसभा लढायची तयारी कशी करू शकतात ?
असा प्रश्न सामान्य जनतेला तर पडला आहे पण राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे!
तिलोत्तमाताई व त्यांचे पती रवींद्र पाटील कधी कुणाला भेटत नाही. बोलत नाही, त्यांचे थेट मोठे सामाजिक योगदान नाही. आणि अचानक विधानसभा?
उत्सुक अन्य उमेदवार त्यांचे सोबत असल्याचे फोटो आले हा योगायोग आहे का?
प्रा अशोक पवार, कृषिभूषण साहेबराव दादा, सचिन बाळू पाटील, उमेश पाटील असे अनेक इच्छुक असताना रिताताई व अन्य एक इच्छुक तिलोत्तमाताई यांचे सोबत फोटोत दिसत आहेत.
याचा अर्थ काय?
अमळनेर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटात सुंदोपसूंदी सुरू असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे असे सामाजिक क्षेत्रात बोलले जात आहे.
ही अंतर्गत बंडाळी असेल तर अनिल पाटील पुन्हा निवडुन येणार नाहीत याची काळजी घेऊ असे जाहीर बोलणाऱ्या शरद पवार यांना तोंडावर पाडण्यासाठी चाललेला प्रयत्न म्हणावा का?
कुछ तो गडबड है दया...
आमची तर शंका!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments