पारोळावाले, कलालीवाले, सुरत वाले (झाडीकर), मैदानात जोरदार उतरले पण कुस्ती न खेळताच माघारी निघून गेले?
पारोळा तामसवाडी येथील साहेबराव पाटील (निवृत्त पोलीस अधिकारी) यांनी गत निवडणुकीत जोरदार दंड थोपटत जमवा जमव करून शक्ती प्रदर्शन केले. खूप खर्च केला, पण नामनिर्देशन दाखल होण्या आधीच घरची वाट धरली! आम्ही त्या वेळीच ठळक बातम्या केल्या होत्या!
तालुक्यातील एका निवृत्त पोलीस अधिकारी यांना खाशी मंडळाचे स्वप्न पडले, पॅनल मध्ये घेतीलच व विजयी होऊन डॉ बी एस पाटील यांचे सारखे भविष्यात आमदार देखील होऊ अशा 'मोहन सॉरी मोहक' भ्रमात त्यांनी 'मंगल-मंगल' म्हणत जोरदार दौरे देखील केले, आयत्यावेळी आलेले हे पार्सल रवाना करा असे आवाहन लोकहितवादीने केले, बातम्या लावून धरल्या! त्या मूळे त्यांना कुणीही जवळ केले नाही. त्यांना फॉर्म न भरता गप बसायची वेळ आली.
तसेच सुरतकर (झाडीकर?) 'प्रकाश मांजरा' यांना अचानक आपल्या मातृ भूमीची आठवण झाली व त्यांनी कार्यालय उघडून, पत्रकार परिषद घेऊन, रॅली काढून व जोरदार पत्रक व फलकबाजी करून आपणच भावी उमेदवार (की,आमदार,?) असा दावा ठोकला! 'नोटांचा बादशाह'ने मदत देखील केली म्हणे!
पण आपली दाळ इथे शिजणार नाही असे लक्षात येताच 'आरोग्य हे कारण पुढे करून' माघार घेतली. 'खरे खोटे देव जाणे!'
या तीनही पोलीस अधिकारी यांचे अचानक आगमन स्वार्थासाठी असल्याचे लेखन करून आम्ही त्या त्या वेळीं विषय लावून धरला. त्यामुळे पोलीस अधिकारी साहेबराव पाटील तामसवाडीकर यांची घर वापसी झाली, तर 'मंगल-मंगल' करणाऱ्याला आम्ही मांडलेल्या सत्या मुळे कोणत्याही पॅनलने स्थान दिले नसल्यानेच ते खाशी मंडळातुन फॉर्म न भरताच घरी गेले! हा सत्य इतिहास आहे! आता जी प सदस्य होणे हे त्यांचे स्वप्न आहे म्हणतात! तिथेही आम्ही भिडू.. टायगर अभी जिंदा है!!
आणि आता गुजरात येथील निवृत्त पोलीस अधिकारी, राष्ट्पती पारितोषिक मिळालेले प्रकाश आर. पाटील तथा प्रकाश मांजरा यांनी चक्क मैदानातून माघार घेतली आहे.
या तीन पोलीस अधिकारी लोकांचे स्वप्न भंग करण्याचे काम ("भ्रमाचा भोपळा फोडण्याचे?) केवळ आणि केवळ लोकहितवादी पत्रकार धनंजय सोनार यांच्या लेखणीतून झाले.
आयत्या वेळी मातृभूमीला वंदन करणे, किंवा अमळनेरच्या मतदारांना विकाऊ समजून कुणी आश्वासनाचे लाडू देत असेल तर ते चालणार नाही हे आम्ही वेळोवेळी बातम्या करून जनतेस पटविले.
या तीनही पोलीस अधिकारिंच्या 'घर वापसीचे' श्रेय फक्त लोकहितवादीला जाते. हे सर्व ज्ञात सत्य आहे!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments