अमळनेर ढेकू रोड येथील माता भगवती नगर परिसरात घाणीचे साम्राज्य असून परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
या परिसरातील अनेक लोक तापाने फणफणले असून रोशन प्रफुल्ल पवार हा युवक डेंग्यूने गंभीर आजारी असताना आभाळाला हात लावून आला. आता त्याची प्रकृती स्थिर असली तरी यास परिषदेचे दुर्लक्षच कारण आहे.
या कॉलनी सह शहरात सर्वत्र काटेरी झुडुपे, गाजर गवत, डबके, तुंबलेल्या गटारी, अस्वच्छता पसरली आहे.
माझी वसुंधरा स्पर्धेत बिभागात प्रथम असलेल्या अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत की फोन उचलत नाहीत.
नागरिकांचा जीव गेल्यावर यांना भान येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments