माळी व चर्मकार समाजाचा आ.अनिल पाटील यांना पाठींबा नाहीच!

पायाखालील वाळू घसरली म्हणून हे उपद्व्याप सुरू केलेत का?-विरोधकांचा जोरदार पलटवार!! 
अमळनेर येथील चर्मकार व माळी समाजाचा जाहीर पाठींबा मिळाल्याच्या बातम्या समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने दोन्ही समाजातील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत असताना जबाबदार पदाधिकारी व समाजाचे नेत्यांनी 'आम्ही असा पाठींबा दिलेला नाही' म्हणत थेट पत्रक काढले आहे!

समाजाचा एक व्यक्ती म्हणजे संपूर्ण समाज नसतो असा स्पष्ट उल्लेख देखील केला आहे. 
या पाठिंबा नाट्यामागे पायाखालची वाळू घसरत असलेला नामदार बालिश खेळ करीत आहे असा थेट आरोप विरोधी गटा कडून होत आहे.  
अमळनेर राष्ट्रवादी (अजित) गटाच्या सर्व्हे नुसार अनिल दादा यांचे काही खरे नाही म्हणून उमेदवार बदलावा अशी चर्चा सुरू झाल्याने असे पाठिबा नाट्य सुरु झाले असावे असा  दावा डॉ रवींद्रबापू चौधरी यांनी देखील केला आहे! 
थोडक्यात काय तर काचमाळी किंवा चर्मकार समाजाने अनिल पाटील यांना पाठिंबा दिलेला नाही मग हे नाट्य का घडत आहे? हा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात आहे. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments