राज्यातील जागा वाटपाचे गणित सुटत आले असले तरी अमळनेरातील तिढा अद्याप सुटत नाही असे दिसते.
डॉ अनिल शिंदे व संदीपराजे घोरपडे काँग्रेस कडून तर शाम पाटील व साहेबराव पाटील एस पी राष्ट्रवादी कडून पाय रोवून तिकिटांच्या लाईनीत उभे आहेत!
नक्की कुणाला तिकीट द्यावे याची आता पर्यंत वाटाघाट सुरू आहे. आणि वरील चार लोकांपैकी कुणालाही तिकीट मिळाले तर प्रा. अशोक पवार, प्रशांत निकम, के डी पाटील यांची काय भूमिका राहील? हा प्रश्न आहेच.
आज सायंकाळ पर्यंत हा तिढा सुटेल असे सूत्रांनी सांगितले असून संदीप घोरपडे यांनी देखील जोरदार फिल्डिंग लावली असल्याने सायंकाळी धक्कादायक नाव जाहीर झाले नाही तर नवल म्हणावे लागेल.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments