आपसातील मतभेद विसरून कामाला लागा, पक्षाचे आदेश पाळा, आपला उमेदवार निवडून आणा! असा फतवा शरद पवार, उद्धव ठाकरे व नाना पटोले यांनी काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता अनिल शिंदे हे उमेदवार असणार की साहेबराव पाटील हेच ठरायचे बाकी असल्याचे संकेत असून उद्या दुपारी हा तिढा संपून फायनल निर्णय येऊ शकतो.
काल पर्यंत डॉ अनिल शिंदे तुतारी चे उमेदवार ही बातमी त्यांनीच दिली होती, नंतर घडामोडी झाल्या. पण अचानक घडामोडी घडल्या... त्या मुळे अमळनेर मतदार संघाचे तिसरे उमेदवार ठरेना..!
अनिल पाटील यांना पुन्हा विजयी होता येणार नाही याची काळजी घेऊ असे शरद पवार बोलले होते, त्यांचा शब्द खरा करायचा असेल तर डॉ अनिल शिंदे व कृषिभूषण साहेबराव पाटील हेच उत्तम पर्याय आहेत असा जनमानस आहे.
नाहीतरी शिरीषदादा चौधरी यांनी आजच प्रचारात आघाडी घेतली असल्याने अनिलदादा पाटील यांच्या गोटात धास्ती आहेच!
आता प्र'भावी' आमदार असा आशावाद निर्माण करणाऱ्या शिरीष चौधरी यांना अनिल भाईदास पाटील यांचे पेक्षा कृषिभूषण साहेबराव किंवा डॉ अनिल शिंदे हेच योग्य पर्याय ठरू शकतील असाही दावा केला जात आहे!
तूर्तास राष्ट्रवादी तूतारी चे उमेदवार डॉ अनिल शिंदे की साहेबराव पाटील? या बाबत साशंकता आहे!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments