विसरू-मिसळू! -धनंजय सोनार, अमळनेर

●विसरू-मिसळू!●


चुकलाच तर माफी नाही

ठेवून द्यावी एकच त्याच्या !
चूक आपली असली तर
नक्की पडूया पायात त्याच्या !!

चूक मंजूर 'न' करताही
ज्याला असेल 'घमेंड' काही!
तरी त्याला 'लवून' मुजरा
एक 'संधीही' जरुर द्यावी!

त्यांच्या चुका मी पोटी घेतल्या
माझेही त्यांनी पदरी घ्यावे!
उगी 'ताणून' आपसातले
भेद कशाला 'जाहीर' व्हावे?

ऐकून घेतो म्हणून कोणी
'पामर' मजला समजला!
तर, मात्र त्यास माफी नाही,
लक्षात घ्यावे... सिंह गर्जला!!

बुद्ध म्हणाला शांत राहावे
गांधीही म्हणाला मूग गिळा!
मग कशाला हे हेवेदावे?
कशास हवी कपटी 'शाळा?'

झाले गेले विसरून जाऊ
पुन्हा पडुया गळ्यात सारे!
गर्व, अहंकार, मस्ती, राग
विसरून देऊ एक नारे!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजय सोनार
'अभियान' 
देशमुख वाडा, अमळनेर (जळगांव)
४२५४०१
संपर्क-७९७२८८१४४०

Post a Comment

0 Comments