अमळनेर काँग्रेस व तुतारी गटातील इच्छुक कोणत्या वाटेने ?

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ? नेते व  जनता संभ्रमात! पण चित्र नक्की  स्पष्ट होणार!! 
आम्हांलाच उमेदवारी द्या म्हणत तुतारी फुंकणारे सचिन बाळू पाटील, प्रा अशोक पवार, तिलोत्तमा पाटील, निकम, शाम पाटील, कृषिभूषण पाटील असे अनेक इच्छुक उमेदवार असताना अचानक भयानक निर्णय घेणारे शरद पवार यांनी डॉ. अनिल शिंदे यांच्या 'हाती' 'तुतारी' दिली असल्याचे आता तरी चित्र आहे. 
काँग्रेस कडून जोरदार तयारी करणारे संदीपराजे घोरपडे, के डी पाटील, प्रा.सुभाष पाटील यांची काय भूमिका राहील?
अशा परिस्थितीत तुतारी आमचीच म्हणणारे डॉ अनिल शिंदे यांचे समर्थन करणार  का? 
उबाठा, काँग्रेस व शरद पवार गटातील सर्व नेते अनिल भाईदास पाटील यांचे विरोधात उभे राहतील का? या बाबत अनेकांना साशंकता आहे. 
आपल्याला तिकीट मिळाले नाही याचा वचपा काढून काही अनिल पाटील यांची तरफदारी करतील की शिरीष दादा यांची तळी उचलतील? हे येणाऱ्या काही दिवसात ठरेल! 
तूर्तास तर्क वितर्क सुरु राहतील. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972882440

Post a Comment

0 Comments