अमळनेरात होणार काटे की टक्कर !

डॉ अनिल शिंदे व माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे अनिलदादा पाटील यांचे समोर तगडे आव्हान!!

कृषिभूषण दादा यांची भूमिका देखील ठरेल निर्णायक!!!
तुतारी चिन्ह डॉ अनिल शिंदे यांना मिळाल्याचे खुद्द अनिल शिंदे यांनीच सांगितले. ही नाट्यमय घटना आहे, तुतारी वाजविणारे गुलाबराव मशाल हाती घेणार व पंजा वाले अनिल शिंदे तुतारी फुंकणार हे नवलच झाले. 
डॉ अनिल शिंदे यांचा मोठा समर्थक वर्ग मतदार संघात आहे, काँग्रेस च्या मतदारा सोबत ठाकरे गट व तुतारीचे मोठे समर्थक त्यांच्या पाठीशी उभे राहतील, 
त्यात माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी मोठी सहानुभूती मिळविली आहे, आपणच आमदार अशी भावना जनतेत निर्माण करण्यात ते यशस्वी झाले असल्याने त्यांचा दावा देखील मोठा आहे. तसेच मत विभागणीचा फायदा त्यांना झाल्यास ते देखील मोठे दावेदार आहेत. 
विद्यमान आमदार (माजी मंत्री) अनिलदादा पाटील यांनी शेवटच्या काळात मोठा निधी आणून केलेले भूमीपूजन व घोषणा देखील लोकप्रिय झाल्या असल्याने त्यांना कमी लेखता येणार नाही. 

थोडक्यात शिरीषदादा चौधरी व डॉ अनिल शिंदे यांचे तगडे आव्हान अनिल भाईदास पाटील  यांचे पुढे उभे आहे! 
त्यातही माजी आमदार कृषीभूषण साहेबरावदादा यांनी तुतारीच फुंकू म्हणत उद्या मेळावा आयोजित केला आहे. तिकीट जर शिंदेना गेले हे खरे असेल तर कृषिभूषण अपक्ष उभे राहणार की स्वभावा नुसार नवी भूमिका घेणार हे उद्या निश्चित होऊ शकते. 
अनिल पाटील यांना ही निवडणूक सोपी नसली तरी सरळ कुणालाच नाही हे मात्र नक्की! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments