अमळनेरात संविधान दिवस साजरा! आदित्य ग्रुप व पुरोगामी परिवार आयोजित कार्यक्रमात अनेकांची उपस्थिती!!

संविधान दिवसा निमित्ताने केला मान्यवरांचा सत्कार!!! 
मनोहरनाना पाटील व बिल्डर प्रशांत निकम यांनी आदित्य पेट्रोलियम चे आवारात सुंदर हॉल उभारला, या हॉल चे उद्घाटन व त्या निमित्ताने पहिलाच कार्यक्रम संपन्न झाला.  
संविधान दिवसाचे औचित्य साधून शून्यातून विश्व निर्माण करणारे प्रथित यश मुंबई उच्च न्यायालय व अमळनेर न्यायालयाचे वकील सारांश सोनार व औरंगाबाद उच्च न्यायालयाचे वकील हुसैद काझी यांचा सत्कार करण्यात आला. 
धनंजय सोनार यांनी ऍड सारांश सोनार यांचे वतीने मनोहर नाना पाटील यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. 
प्रा अशोक पवार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले,.  संदीपराजे घोरपडे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. 
या कार्यक्रमास डॉ अनिल शिंदे,  अँड रज्जाक शेख, अँड.शामीभा काझी, प्रा. गणेश पवार, शेख ताहेर तय्यब, विश्वास पाटील, श्रीकांत चिखलोदकर, अरुण देशमुख, भटू पाटील, सिद्धार्थ खैरनार, यशोदत्त सोनवणे, हर्षल खैरनार, अजिंक्य चिखलोदकर,  हिरामण कंखरे, रावसाहेब वानखेडे, प्रा.भानुदास गुलाले, मंगला सोनवणे, प्रमिला ब्रह्मे, सिद्धार्थ सोनवणे,  चिंधू वानखेडे,  के  डी पाटील, विनोद पाटील, इंजि. दिनकर पाटील, सुनील पाटील, योगेश पाटील, मनोहर पाटील, रियाज शेख पत्रकार अजय भामरे, दर्शना पवार आदी उपस्थित होते.  
प्रशांत निकम व मनोहरनाना पाटील यांची कल्पकता व मध्यवर्ती भागात सुसज्ज हॉल उभारला त्या बद्दल उपस्थित सर्वानी कौतुक करून या हॉल चे नाव 'संविधान भवन' ठेवावे असे  आवाहन करण्यात आले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments