कुंटेरोड महात्मा फुले मार्केटला एकतर्फी पार्किंग करून व्यावसायिकांना पोट भरू द्या!

प्रकाश महाजन व व्यावसायिकांच्या एकमुखी मागणीस अनेकांचे समर्थन!! 
अमळनेर येथील कुंटेरोडवरील बालमिया मशीद ते सुभाष चौक पर्यंत दोन्ही रस्त्यावर वाहनधारक बेशिस्त पार्किंग करतात व पोटासाठी भाजीपाला , फळे व अन्य किरकोळ व्यावसायिकांना मात्र जागा उपलब्ध होत नाही तसेच त्यांना हाकलून लावले जाते. 
या दुतर्फा रस्त्यावर मध्यभागी दुचाकी पार्किंग जर एकाच बाजूला केली तर पार्किंग देखील होईल व किमान 100 लोक व्यवसाय करून चरितार्थ चालवू शकतील. 
ही पार्किंग व्यवस्था दुरुस्त करावी व अमळनेरात रोजगार वाढीची संधी देऊन गरिबांना पोट भरायची सोय करावी अशी मागणी किरकोळ भाजीपाला विक्रेते व ठोक व्यापारी संघाचे नेते प्रकाश महाजन, किरकोळ व्यावसायिक व जनतेने केले आहे. 
न प प्रशासन व राजकीय नेत्यांनी याची दखल घेतल्यास मोठा प्रश्न सुटेल. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments