अमळनेर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. जयेश शिंदे यांचे इस्पितळात तीव्र पोटदुखीने भरती झालेल्या अमळनेर तालुक्यातील नगाव येथील संगीताबाई पंढरीनाथ वारुळे या पन्नास वर्षीय महिलेच्या पोटातून चक्क तीन किलो सातशे ग्राम वजनाची 19×15 सेंटीमीटर व्यासाची गाठ काढून या महिलेचा जीव वाचविण्यात डॉ जयेश व डॉ प्रतिज्ञा शिंदे यांना यश मिळाले.
23 नोव्हेंबर रोजी तीव्र पोटदुखीने भरती झालेल्या संगीता वारुळे यांचेवर 24 रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली.
अवाढव्य असलेल्या फायब्रीब (fibrib) या प्रकाराचा हा गोळा काढून जीवदान देणाऱ्या सुखाजनी हॉस्पिटलच्या तज्ज्ञांचे रोहिदास पंढरीनाथ वारुळे व कुटुंबातील सदस्यांनी आभार मानले.
अत्यन्त अवघड अशी शस्त्रक्रिया करणारे डॉ जयेश शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments