अमळनेरच्या अटी-तटीच्या लढतीत, लक्ष्मी दर्शनच ठरेल निर्णायक!

लाडकी बहीण, भाऊ, भाचा, साला, पाव्हणा योजना फेल जाणार?
दलित मुस्लिम मते देखील निवडणूक निकालावर मोठा  प्रभाव टाकतील!! 
अमळनेर मतदार संघात काटेकी टक्कर होत असून तीनही उमेदवार आर्थिक, राजकीय व सर्व दृष्टीने 'समर्थ' आहेत. नक्की कोण विजयी होणार हे ब्रम्हदेवास देखील सांगता येणार नाही अशी रंगतदार लढत होत आहे. 
डॉ अनिल शिंदे व त्यांच्या सर्व सहकारींनी जोरदार यंत्रणा राबविली असून माजी आमदार
शिरिषदादा चौधरी यांचे काटेकोर नियोजन व गत काळातील विकासकामे हा मुद्दा प्रभावी ठरत आहे.
मंत्री अनिलदादा पाटील यांनी या दोघांची इतकी धास्ती घेतलीय की थेट सुरत येथून 3 खाजगी बस भरून ते बाहेरगावी असलेले मतदार मागवत आहेत. 
एकूणच अनिल पाटील यांचे एका एका मतावर लक्ष आहे,. 
थोडक्यात तिघे उमेदवार जोरदार लढत देत असून सर्वांचा हात मोकळा सुटल्याचे दिसत आहे. 
★शिरिष चौधरी यांनी विजय न मिळवला तर त्यांचे राजकीय भविष्य अंधारात राहील. 
तसेच 
★डॉ.अनिल शिंदे यांचा हा शेवटचा प्रयत्न म्हणून ते कायमस्वरूपी राजकिय पडद्याआड जातील! 
पण 
★मंत्री अनिल पाटील यांनी पराभव स्वीकारला तर त्यांचा केवळ राजकीय भ्रमनिरास सोडला तर आर्थिक नुकसान मात्र होणार नाही. 
उलट ते नफ्यात राहतील कारण प्रतोद, मंत्री, पालकमंत्री असे पद भोगणारा माणूस तोट्यात असूच शकत नाही! असे जनमानस आहे. 
एकूणच 
●अनिल शिंदे यांची कोरी पाटी आहे, त्यांना संधी द्यावी, 
●शिरिषदादा यांनी ठळक विकासकामे केली म्हणून त्यांना विजयी करावे, 
की 
●अनिल पाटील यांनाच विजयी करावे या संभ्रमात असलेले 
मतदार शेवटच्या रात्री 'नोटा' पाहूनच मतदान करतील किँवा 'नोटा घेऊनही'  जात-धर्म-काम बघतील? 
याचा निर्णय 23 नोव्हेंबर रोजीच समोर येईल. 
थोडक्यात, लक्ष्मी दर्शन हा सगळ्यात मोठा मुद्दा ठरेल तसे दलित व मुस्लिम मते देखील निर्णायक ठरतील, लाडकी बहीण, भाऊ, भाचा हे गारुड फेल जाईल हे सांगणे न लगे! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments