आधी मंत्री अनिलदादा पाटील यांची सोबत, नंतर वाऱ्यावर वरात, पुन्हा धुळे व राजवाडला मिटिंग! त्या नंतर डॉ अनिल शिंदे यांचे सोबत रॅली ? शिरिषदादा यांचे स्वागत!
मात्र त्यांचे हस्तक असलेले काही नगरसेवक व कार्यकर्ते, समर्थक, पंटर अनिल पाटील यांचे सोबत तर काही शिरिषदादा यांचे सोबत!
स्वतः कृषिभूषण साहेबराव पाटील मात्र आज मैदानात येणार उद्या येणार म्हणत सर्वाना खेळवत राहिले.
अमळनेर सोडून शबरीवर प्रेम करण्याचे नाटक की सन्यास घेण्याची तयारी? या बाबत अमळनेर मतदार संघात जोरदार चर्चा सुरू आहे.
विकासासाठी ज्यांचे मोठे योगदान आहे अशा माजी आमदारांनी या निवडणुकीत तिघे उमेदवारांना वेळोवेळी खेळवत- झुलवत ठेवणे ही चाणक्य नीती की राजकीय आत्महत्या? असा सवाल देखील केला जात आहे.
अगदी 2 दिवस उरले असताना कृषिभूषण नक्की कुणाची बाजू घेतील? अकस्मात काही घोषणा करतील? की अज्ञातवासातच राहतील? हे उत्तर तेच देऊ शकतात.
त्यांचे मौन राहने ही त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल हे मात्र नक्की! कारण साहेबराव दादा यांचेवर प्रेम करणारे लोक मतदार संघात आहेत आणि आपला नेता काही बोलत नसेल व तिन्ही उमेदवाराना खेळवत असेल तर संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे.
दादा,
दोन दादा व डॉ शिंदे यांचे कडे तुमचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत असे दिसते. तुम्ही नक्की कुणाचे बाजूला?
अर्थात राजवड येथील मतदान या प्रश्नाचे उत्तर 23 तारखेस देणार आहेच!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments