प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर सुरू झालेल्या अमळनेर येथील थिएटरला आग!

'खोकलानी' सेफ शेकडो प्रेक्षक बचावले! अनेक गंभीर,मात्र प्रशासन अद्याप झोपलेले!!
मात्र मानसिक धक्क्याने अनेकांची आजही प्रकृती खालावलेलीच!
मोठा गाजा-वाजा करून अमळनेर येथे थिएटर सुरू झाले, पण तिसऱ्याच दिवशी सायंकाळच्या शो वेळी आग लागल्याने काच तोडून प्रेक्षकांना बाहेर काढून अग्निशमन दलाचे दिनेश बिऱ्हाडे, जाफर पठाण, फारूक शेख, आनंदा झिम्बल, आकाश संदानशीव, योगेश कंखरे, आकाश बाविस्कर व पथकाने जीव वाचवले. 
कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसलेल्या या थिएटरला कुणी परवानगी दिली? 
'खोकलानी' गुदमरून मरण्या आधी अनेक लोक दवाखाण्यात भरती करण्यात आले त्यातील हर्षदीप पाटील व आर्यन साळुंके व 2 लोक गंभीर आहेत. तर जे घरी गेले ते भयंकर मानसिक आघात झाल्याने धोक्या बाहेर नाहीत. 
त्यांचेवर कायमस्वरूपी विघातक परिणाम होईल याची शक्यता नाकारता येत नाही. 
पुरेशि सुरक्षा व्यवस्था न केल्या बद्दल एस एन सिनेप्लेक्स या अमळनेर येथील थिएटर चालक व मालकासह सर्व संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे! 
*बातमीत प्रसिद्ध फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments