कोणतीही अग्नी शमन यंत्रणा वा सुरक्षा व्यवस्था नसल्याने काच तोडून अग्नी शामक दलाने काच तोडून लोकांचा जीव वाचविला!
मालकाची दहशत म्हणू की व्यवस्थापण? एकाही माध्यमाने ही बातमी केली नाही..
या दुर्घटनेतील काही लोक अद्याप उपचार घेत असून अनेक लोक मानसिक धक्क्यातुन सावरले नाहीत.
थिएटर मालक, चालक यांचे विरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुरेशी व आवश्यक सुरक्षा यंत्रणा नियमानुसार करायला हवी ती नसताना देखील ना हरकत परवाना कुणी का व कसा दिला?
या बाबत काही सामाजिक कार्यकर्ते प्रशासनाकडे तक्रार घेऊन गेले आहेत.
लोकांचा जीव धोक्यात घालणारे मल्टीप्लेक्स वाले बेजबाबदार व्यावसायिक मोकाट व प्रेक्षक मात्र मानसिक धक्क्याने खचले आहेत, याची प्रशासन दखल घेणार आहे का?
असा सवाल सामाजिक क्षेत्रात व्यक्त होत आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकारी व सेवकांनी जीवावर उदार होऊन लोकांना वाचवले त्या बद्दल लाख लाख आभार!
घटनेचे फोटो, व्हिडीओ व नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन सविस्तर वृत्त उद्या!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments