पळासदळे रस्त्यावर असलेल्या भरुचा यांचे शेतात बेकायदेशीर कैद केलेल्या निल गाय प्रकरणी वनविभागाने मौन साधले आहे.
सर्पमित्र गणेश शिंगारे यांचे तक्रारी नंतर वनाधिकारी चक्क दुचाकीवर पोचले होते व त्यांनी तक्रारदार व पर्यावरण मित्र शिंगारे यांचीच झाडाझडती घेतल्याने लोकहितवादी ला मिळालेल्या तक्रारी नंतर त्यांनी वाहन मागवून निलगाय ताब्यात घेतली. पुढे नीलगाय कुठे नेली? भरुचा यांनी निलगाय का बंदिस्त केली होती? त्या प्रकरणी गुन्हा का दाखल केला नाही? पंचनामा केला की नाही? नीलगाय बंदिस्त करण्याचे कारण काय? अशी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
जर वन विभाग कारवाई करणार नसेल तर सामाजिक कार्यकर्ते जनहित याचिका दाखल करतील असा इशारा देण्यात आला असून वरिष्ठांना या प्रकरणी तक्रार देखील करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments