मी चांगले काम केलंय लोक माझे पाठीशी म्हणत कृषिभूषण साहेबराव दादा अति आत्मविश्वासात लोकमतावर गाफील राहिले.. तसे नंतरच्या निवडणुकीत शिरिषदादा देखील गाफील राहिले.. आणि पडले,.. त्यांचा निसटता पराभव होता हे खरे पण एकदा कोटयावधीचे विकास काम करणारे कृषिभूषण साहेबराव पाटील चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते याची आठवण सर्वाना आहे.
थोडक्यात गाफील राहिलात, अति आत्मविश्वास दाखवला तर घात होऊ शकतो..
अनिल पाटील हे
'मी मंत्री होतो, सुप्रमा आणली, निधी आणला' या भ्रमात राहून गाफील राहिले तर त्यांची घरवापसी होऊ शकते..
तसेच डॉ. अनिल शिंदे हे जर 'आजी माजी नको म्हणून लोक तिसरा पर्याय शोधत मलाच विजयी करतील' या भ्रमात राहिले तर त्यांचा देखील भ्रमनिरास होऊ शकतो.
माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांनी आपल्या मागे गर्दी आहे हे पाहून बेसावध राहिल्यास त्यांचाही घात होऊ शकतो.
थोडक्यात तीन मातब्बर उमेदवार असून तिघांचे कॅम्पेन जोरात सुरू आहे, पण एकही छोटीशी चूक मोठा फटका देऊ शकते.
कुणालाही किरकोळ लेखून केलेले दुर्लक्ष घातक ठरू शकते. याचे भान तिघांनी ठेवायला हवे.
एका दोघांनी पत्रकारांच्या पॅकेज मध्ये फरक करताच ओरड झाली, तिसरा तर बिलकुल मागे पडल्याने पत्रकारांनी त्यांची दखल घेतली नाही, पत्रकार हा मोठा आधार असतो याचे भान ठेवताना लेखणीची कदर देखील केली पाहिजे,..
असाच प्रकार विविध समाज, आजी माजी नेते, कार्यकर्ते यांच्या बद्दल तीनही प्रमुख उमेदवारांत झाल्याने तिघेही अति आत्मविश्वासात असल्याचे आता तरी दिसत आहे!
'मनी नो मॅटर' तरीही 'मनी हाच फॅक्टर' असणार ही आजची सर्वांची मानसिकता आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440




0 Comments