संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागीना किडे पडोत!



राजे असते तर हत्तीच्या पायी तुडवले असते, किंवा कडेलोट केला असता!!
वाल्मिक कराड प्रकरणी अखेर धनंजय मुंडे याला राजीनामा द्यावा लागला..
अंगात मस्ती आली की काय शिक्षा भोगावी लागते याचे हे उदाहरण आहे, या पूर्वी अनेकांनी आरोप होताच नैतिक जबाबदारी स्वीकारून पद त्याग केल्याचे दाखले आहेत. पण धनंजय मुंढे प्वार्षंभागावर लाथ मिळे पर्यंत पदाला चिकटून बसला!
लाज वाटायला हवी.. आकाचा आका अशी थेट टीका भाजप आमदार धस यांनी व अनेकांनी केली.. तरी याला लाज वाटली नाही याचे वाईट वाटते!
वाल्मिक कराडचे हस्तक इतका क्रूरपणा करतात व नीच वाल्मिक कराड तो व्हिडीओ पाहतो याची समस्त मानव जातीला लाज वाटणारी घटना आहे.
पंत खरोखरच गृहमंत्री असल्याची भूमिका पार पाडणार असतील तर त्यांचे स्वागत.
वाल्मिक कराड ह्याने एखाद्या व्यक्तीच्या क्रूर पणे मारतानाचा व्हिडीओ पाहून आनंद व्यक्त करावा व त्याचा कथित 'आका' 4 महिने निर्लज्जपणे मंत्री म्हणून फिरत होता हे पुरोगामी महाराष्ट्रात अशोभनीय वर्तन आहे.
राज्याचे मुख्यमंत्री व गृह खाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस, त्यांचे अखत्यारीत असलेले पोलिस योग्य तपास करतील व न्याय यंत्रणा योग्य निर्णय देइल असा विश्वास आहेच.
संतोष देशमुखला मारतानाचा व्हिडीओ क्लिप पाहता मारेकरी, वाल्मिक कराड व त्याचे हस्तकाना किडे पडोत.. आणि मरणाची भीक मागत देखील त्यांना मौत नशीब होऊ नये इतकीच सामान्य जनतेची इच्छा..!
एका चॅनेल वरील अँकर लाईव्ह रडते, प्रसिध्द फोटो व बातमी पाहून संबंध महाराष्ट्र रडतो या पेक्षा गंभीर काय आहे?
अजित दादा आपण धनंजय मुंढे यांना का पाठीशी घातले? त्याने राजीनामा देण्या पेक्षा त्याची हकालपट्टी का केली नाही? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. दादासाहेब, आता सावरा स्वतःला.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments