राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांची आरोग्य तपासणी!


डॉ.गिरीश गोसावी व डॉ जि. एम.पाटील यांची माध्यमांना माहिती.
अंगणवाडी, शाळा, आश्रम शाळा, जि.प.शाळा व वस्तीगृहात तपासणी मोहीम.
 महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार   नुसार  तालुक्यातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू झाली आहे. १ मार्च  रोजी जि. प. शाळा जवखेडा येथे आर. बी. एस. के. अंतर्गत विशेष तपासणी मोहीमचे उद्घाटन झाले.
   या मोहिमे अंतर्गत सर्व मुलांची आरोग्य तपासणी, किरकोळ आजारावर उपचार, विशेष आजाराच्या मुलांना संदर्भ सेवा दिल्या जाणार आहेत. यात जन्मजात व्यंग, कमतरता, आजार, व विकासात्मक विलंब शोधून त्यांना मोफत उपचार, शस्त्रक्रिया करण्यात येतील. अमळनेर तालुक्यात १ मार्च  ते ३१ मार्च २०२५ पर्यंत शाळा व अंगणवाडी तपासणी वेळापत्रक करण्यात आले आहे अशी माहिती अमळनेर ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ जी. एम. पाटील यांनी दिली. 
३ मार्च रोजी अंगणवाडी आर्डी,  अनोरे, अटाळे, हेडावे ४ मार्च रोजी अंगणवाडी लोनपंचम, सुंदरपट्टी, ५ मार्च अंगणवाडी लोन बुद्रुक ,बोहरा येथे तपासण्या करण्यात आल्या. ६ मार्च रोजी आश्रम शाळा पिंगळवाडे, अंगणवाडी आंचलवाडी, ७ मार्च अंगणवाडी, एकतास व आंबेडकर बॉईज हॉस्टेल, ९ मार्च अंगणवाडी एकलहरे व धुपी, १० मार्च अंगणवाडी पाडळसरे, दापोरी, ११मार्च आश्रम शाळा अंतुर्ली रंजाने, आश्रम शाळा ताडेपुरा, १२ मार्च अंगणवाडी भोरटेक व रुंधाटी, १३मार्च अंगणवाडी सबगव्हाण व कुर्हे, १५ मार्च अंगणवाडी कन्हेरे हिंगोणे मेहरगाव, १७ मार्च अंगणवाडी, बिलखेडा, सोनखेडी, फापोरे. १८मार्च केंद्र शाळा मारवड पुनर्तपासणी व अंगणवाडी पिंगळवाडे, १९ मार्च अंगणवाडी निमझरी केंद्रशाळा फापोरे, २० मार्च अंगणवाडी कळंबे, बामणे व केंद्र शाळा फापोरे, २१ मार्च आश्रम शाळा दहिवद व केंद्र शाळा शहापूर. २२ मार्च केंद्रशाळा अंतुर्ली व न.पा.शाळा पुनर्तपासणी, २४ मार्च केंद्र शाळा मारवड व  आश्रम शाळा चिमणपुरी, २५ मार्च केंद्र शाळा गडखांब व केंद्र शाळा वावडे पुनर्तपासणी. २६ मार्च केंद्र शाळा सावखेडा व केंद्र शाळा शहापूर पुनर्तपासणी. २७ मार्च केंद्र शाळा जानवे व केंद्र शाळा ढेकू पुनर्तपासणी, २८मार्च केंद्र शाळा जैतपीर व केंद्र शाळा अंमळगाव, २९ मार्च केंद्र शाळा दहिवद व केंद्र शाळा चिमनपुरी पिंपळे पुनर्तपासणी ३० ते ३१ मार्च या कालावधीत संदर्भित लाभार्थी साठी ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे विशेष तपासणी  शिबिराचे आयोजन  करण्यात येणार आहे.
या तपासणी साठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत  अमळनेर तालुक्यासाठी कार्यरत असणाऱ्या दोन तपासणी पथकांमधील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, आरोग्य सेविका यांचे मार्फत शाळा व अंगणवाडी केंद्र तसेच शासकीय वस्तीगृह या ठिकाणी आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. तरी पालकांनी आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन अमळनेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी व ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी.एम. पाटील यांनी केले आहे. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments