ताई,तुमची आमची लेक असुरक्षित झालीय, धिंगाणा कशाला घालतात? तडका फडकी राजीनामा द्या!!
राज्यात व देशात महिलांवर अत्याचार, छेडखानी वाढली असताना जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील यात्रेत थेट स्थानिक भाजप खासदार व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसह अन्य तरुणींची छेड काढण्यात आली.
फोन येताच रक्षा खडसे चक्क त्या आरोपीशी बोलल्या व नीट राहा अन्यथा मी आले तर धिंगाणा घालेल असा इशारा देऊन त्यांनी तंबी दिल्याचे सोशल मीडियावर आले आहे.
अनिकेत भोई, किरण माळी, अनुज पाटील, यांना उशिरा अटक झाली असून अन्य साथीदार फरार आहेत..
मूळ मुद्दा हा की रक्षा खडसे या विद्यमान केंद्रीय मंत्री आहेत, नाथाभाऊ एकनाथराव खडसे यांचा आजही दबदबा आहे तरी त्यांचेच गावात/मतदार संघात मुलींची छेड काढली जाते?
गावोगावी असे गुंड नित्य समोर येत आहेत..सरकार झोपले आहे का? आणि मंत्र्याच्या मुलीवर अशी वेळ येते तर इतरांनी काय करावे? असा सवाल सामान्य नागरिक करीत आहेत.
राज्य व देशात असे प्रकार वाढत असून भाजपा प्रणित केन्द्र व राज्य सरकार महिलांचे रक्षण करण्यात कमी पडत असल्याचा आरोप देखील जनमानसातून व्यक्त होत आहे.
थेट आपल्याच कन्या सुरक्षित नाहीत म्हणून मंत्री रक्षा खडसे व राष्ट्रवादी आमदार एकनाथराव खडसे यांनी देशभरातील महिलांचे रक्षण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार कडून हमी घ्यावी किंवा राजीनामा तरी फेकावा अशी मागणी सामान्य स्तरावर केली जात आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments